बॉलिवूडचे अभिनेते असलेल्या ओमपुरी यांनी बॉलिवूडमध्ये अनेक वर्ष आपला दबदबा ठेवला. त्यांच्या अभिनयाचे चाहते होतेच पण त्यांचा भारदस्त आवाज देखील चाहत्यांना खूप आवडायचा. १८ ऑक्टोबर १९५० ला पटियाला मध्ये जन्मलेल्या ओम पुरी यांचे पूर्ण नाव ओम राजेश पुरी होते. ओम पुरी यांचा जन्म पंजाबी कुटुंबात झाला. त्यांचे वडील भारतीय रेल्वेत आणि आर्मीत काम करायचे.
४० वर्ष फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम केलेल्या ओम पुरी यांनी १९७६ मध्ये आलेल्या घाशीराम कोतवाल या मराठी सिनेमातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. ओत्यांनी पुण्याच्या फिल्म एंड टेलीविजन इंस्टीट्युट ऑफ इंडिया मधून ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे. त्यांनी FTI मध्ये पहिल्यांदा इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला तेव्हा अभिनेत्री शबाना आझमी यांनी त्यांना कसले कसले लोक हिरो बनायला येतात असा टोमणा मारला होता.
ओमपुरी आणि नसरुद्दीन शाह हे नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा मध्ये क्लासमेट होते. या दोघांची मैत्री ४० वर्षापेक्षा अधिक जुनी होती. नसरुद्दीन यांनी अनेक वेळा अडचणीत ओम पुरी यांना मदत केली आहे. नसरुद्दीन शाह यांनी केलेल्या मदतीमुळेच इथपर्यंत पोहोचल्याचे ते नेहमी सांगत.
ओम पुरी यांनी एकेकाळी रोडच्या कडेला हॉटेलवर चहाचे कप धुवून आपली उपजीविका चालवली आहे. त्यांना आयुष्यात खूप संघर्ष करावा लागला. एवढेच नाही तर त्यांनी कोळसा उचलण्यापासून धाब्यावर भांडे धुण्याचे काम देखील केलं आहे. खूप गरिबीतून आलेल्या ओम पुरींनी संघर्ष करत यश मिळवलं.
लहानपणी ते घराच्या मागे असलेल्या ट्रेनच्या यार्डात जाऊन डब्यात झोपायचे. त्यांना लहानपणीपासून ट्रेनचा ड्रायव्हर होण्याची खूप इच्छा होती. काही वर्षानंतर ते आजीकडे पंजाबला देखील राहायला गेले.
ओम पुरी यांचे मोलकरणीसोबत होते अफेअर-
ओम पुरी यांचे आयुष्य अनेक वादांनी घेरलेले राहिले. त्यापैकीच एक धक्कादायक खुलासा म्हणजे त्यांचे १४ व्या वर्षी आपल्या मोलकरणीसोबतचे अफेअर. ओम पुरी यांच्या पत्नी नंदिता यांनी ‘द अनलाइकली हीरो : द स्टोरी आॅफ ओम पुरी’ या पुस्तकात हा खुलासा केला होता.
पंजाबला जेव्हा ते आजीच्या घरी गेले होते तेव्हा वयाच्या १४ व्या वर्षी आपल्या मोलकरणीच्या प्रेमात पडले. आजीच्या घरी येणाऱ्या ५५ वर्षीय मोलकरणीच्या ते प्रेमात पडले. ती मोलकरीण देखील त्यांच्यावर प्रेम करायची आणि त्यांना खूप जीव लावायची. एके दिवशी लाईट गेल्याच बघून मोलकरणीने त्यांचं घर गाठलं आणि दोघांनी पहिल्यांदा शरीरसंबंध देखील ठेवले.
‘असाधारण नायक ओम पुरी’ या पुस्तकानंतर ओम पुरी आणि त्यांची पत्नी नंदिता यांचे संबंध बिघडले होते. या पुस्तकाने त्यांची प्रतिमा मालिन झाल्याचे ओम पुरी यांनी सांगितले होते. प्रकाशनापूर्वी पत्नीने हे पुस्तक वाचू दिले नाही आणि विश्वासघात केल्याचे त्यांचे म्हणणे होते. पुढे ओम पुरी आणि नंदिता विभक्त देखील झाले.