Sunday , May 28 2023
Breaking News
Home / जीवनशैली / काश्मीरमधील कलम ३७० हटवण्याचा फायदा या प्रेमी युगलापेक्षा जास्त कोणालाच झाला नसेल!

काश्मीरमधील कलम ३७० हटवण्याचा फायदा या प्रेमी युगलापेक्षा जास्त कोणालाच झाला नसेल!

जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर देशभरात या निर्णयाचे स्वागत झाले. तर अनेकांनी या निर्णयावर टीका देखील केली. या कलम ३७० हटवल्याने भारतीयांनी अनेक जोक सोशल मीडियावर शेअर केले होते. काश्मीरच्या जमिनी आता आपण घेऊ शकतो असे काही जण म्हणाले तर काही जण म्हणाले तिथे जाऊन आता शेती करूया.

पण या कलम ३७० हटवण्याचा कराडच्या एका तरुणाला जेवढा फायदा झाला आहे तेवढा फायदा देशात कुणालाच झाला नसेल. कराड तालुक्यातील उंडाळे गावातील अजित प्रल्हाद पाटील या युवकाने काश्मीरच्या कलीला कराडची सून बनवून आणले आहे. दोघांनी किस्तवाडमध्ये काश्मिरी पद्धतीने दोघांनी लग्नगाठ बांधली, तर नंतर कराडमध्ये महाराष्ट्रीय पद्धतीने काश्मिरी नातेवाईकांच्या उपस्थितीत सप्तपदी करण्यात आली.

अजित आणि सुमनची हि आगळीवेगळी लव्हस्टोरी खूप रोमँटिक आहे-

अजित पाटील हा तरुण काश्मीरमध्ये भारतीय सैन्य दलात कार्यरत आहे. तो कराड तालुक्यातील उंडाळे गावातील रहिवासी आहे. अजित भारतीय सैन्य दलात सैनिकी शिक्षणाचे प्रशिक्षण देतो. सध्या झाशीच्या अजित हा कार्यरत आहे.

अजीतसोबत राहणाऱ्या सहकारी मित्राकडे पाहुणी म्हणून आलेल्या जम्मू कश्मीरमधील किस्तवाड जिल्ह्यातील जोधानगर पलमार गावात राहणाऱ्या सुमन देवी भगतशी त्याची ओळख झाली. सुंदर असलेल्या सुमनवर अजितला पहिल्याच नजरेत प्रेम झालं. त्यांची लव्हस्टोरी इथूनच सुरु झाली. त्यांचं पुढं बोलणं होत राहील. दोघे एकमेकांचे चांगले मित्र बनले.

लॉकडाऊनमुळे फुललं प्रेम-

अजित पाटील हा मार्च २०२० मध्ये सुमनच्या नातेवाईकांसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेले होते. फिरण्यासाठी त्यांनी १० दिवसांची सुट्टी काढली होती. पण अचानक कोरोनामुळे तेव्हा देशात लॉकडाऊनची घोषणा झाली. लॉकडाऊन जाहीर झाल्याने अजित हा काश्मीरमध्येच सुमनच्या घरी अडकून पडला. १-२ नव्हते तर तब्बल ३ महिने अजितला सुमनच्या घरी राहावे लागले.

लॉकडाऊनचा असा फायदा झाला कि अजित आणि सुमन या ३ महिन्यात एकमेकांच्या प्रेमात बुडून गेले. त्यांचे नाते आणखी घट्ट झाले. तर सुमनच्या घरच्यांना देखील अजितला जवळून बघण्याची संधी मिळाली. अजितला कुटुंबीयांनी समजून घेतलं. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान जर कलम ३७० लागू असते तर या महाराष्ट्राच्या सुपुत्राला काश्मीरच्या कलीशी लग्न करता आले नसते. त्यामुळे हे कलम हटवल्याचा सर्वात जास्त फायदा मला झाल्याचे अजित सांगतो.

अजितच्या कुटुंबीयांनी देखील या लग्नाला लगेच होकार दिला. २७ नोव्हेंबरला या दोघांचं काश्मीरमध्ये लग्न पार पडलं. डिसेंबरमध्ये अजित पाटील बायकोला घेऊन कराडला परतले.

अजितच्या आईच्या मते मुलगा देशसेवेत असल्याने प्रेमविवाह केल्यामुळे समाज काय म्हणेल याची फिकीर नाही. सुमनला त्या सून नाही तर मुलीप्रमाणे जीव लावतात. सुमनचं १२ वी पर्यंत शिक्षण झालेलं आहे. कराड मध्ये गावी आल्यावर ती मराठमोळ्या संस्कृतीत राहते. साडी नेसते. तिला महाराष्ट्राचे राहणीमान आणि सून म्हणून मिळत असलेला मान देखील खूप आवडला आहे.

About Mamun

Check Also

आईच्या मृत्यूमुळे आतून तुटलेली अकाउंटंटची मुलगी दुसऱ्या प्रयत्नात टॉपर येत बनली IAS !

यश श्रीमंत किंवा गरीब किंवा लहान, मोठे पाहत नाही, जो योग्य दिशेने कठोर परिश्रम करतो, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *