Monday , June 5 2023
Breaking News
Home / महाराष्ट्र / ७ रुपये रोजाने पाणीपुरीच्या गाडीवर काम , वेटर म्हणून पुसले टेबल, आज आहे करोडोंचा बिजनेस

७ रुपये रोजाने पाणीपुरीच्या गाडीवर काम , वेटर म्हणून पुसले टेबल, आज आहे करोडोंचा बिजनेस

कठोर परिश्रमाच्या बळावर कुठल्याही परिस्थितीवर मात करता येते हे दाखवून दिले आहे हॉटेलमध्ये हेल्पर वेटर म्हणून काम केलेल्या एक व्यक्तीने. दिवसभर एलआयसीच्या पॉलिसीसाठी फिरायचे रात्री हॉटेलमध्ये काम करायचे हा त्याचा दिनक्रम होता. एकेदिवशी ते एका क्लाईंटकडे पॉलिसीसाठी गेले होते. त्याच्याकडे जाऊन आल्यानंतर रात्री हॉटेलमध्ये काम करताना तोच क्लाईंट त्या हॉटेलमध्ये आला होता. त्याने वेटरचं काम करणाऱ्या सचिनला ओळखलं आणि म्हणाले तुम्ही तर सकाळी माझ्याकडे पॉलिसीचे पैसे न्यायला आले होते मग इथे काम कस काय.

सचिनने त्या क्लाईंट सांगितले कि मी दिवसा एलआयसीचे अन रात्री इथे काम करतो. त्या व्यक्तीने खूप छान काम करताय म्हणून कौतुक केले. असच करत राहा आयुष्यात पुढे जाल म्हणून तो व्यक्ती तिथून गेला. सचिन आनंदात होता. दुसऱ्या दिवशी त्या क्लाईंटचा सकाळीच फोन आला. घरी भेटायला बोलावलं. त्या व्यक्तीने पॉलिसी कॅन्सल करायला सांगितलं. तो म्हणाला तुम्ही जेव्हा आयुष्यात यशस्वी व्हाल तेव्हा मी परत तुम्हाला पॉलिसी देईल तुम्ही तेव्हा परत या. तेव्हा सचिनला खूप वाईट वाटलं. तिथून घरी आल्यावर तो खूप रडला देखील. तेव्हा तो शिकला कि गरीब म्हणून तूम्हाला फक्त सहानुभूती मिळते.

सचिन खराटे एका गरीब कुटुंबातील तरुण मुलगा. अकोल्यातील आई वडील आणि ३ बहीण भाऊ असं ६ जणांचं एक सामान्य कुटुंब. गरिबी नशिबाला पुजलेली होती. गरिबीसोबत खूप संघर्ष त्यांच्या नशिबाला आला. सचिन १० वर्षाचा असतानाच आईच निधन झालं. सचिन ६-७वि पासूनच पाणीपुरीच्या गाडीवर कामाला जायला लागला. त्याला फक्त ७ रुपये रोज मिळायला. तेव्हा त्यांचं कुटुंब अकोल्यात राहत होतं. तो सकाळी ६ ला उठून घरोघरी जाऊन ब्रेड विकायचा. ब्रेडचा त्याचा पहिला बिजनेस होता. ८० पैशाला ब्रेड घेऊन १ रुपयाला तो विकायचा. २६ जानेवारीला झेंडे, १४ जानेवारीला पतंग विकणे असे सिजनल सर्व बिजनेस तो करायचा.

१६ व्या वर्षी या संघर्षाला तो कंटाळला होता. तेव्हा त्याच्या मनात जीवन संपवण्याचा विचार पण आलेला. पण त्याने घरदार गाव सोडून दुसरीकडे नव्याने आयुष्य सुरु करावा असा विचार केला. तो नाशिकला जॉब लागला म्हणून घरून आला. ३ दिवस उपाशीपोटी प्लॅटफॉर्मवर झोपून त्याने जॉब शोधाशोध केली. कुठेच जॉब मिळत नसल्याने त्याने चित्रकूट नावाच्या बारमध्ये जाऊन विचारपूस केली. हेल्पर म्हणून तात्काळ जॉब मिळाला. टेबल साफ करण्याचं त्याला काम होतं. तिथं त्याला २० रुपये रोज होता. त्याने वेटर म्हणून काम द्यावं असं मालकाला विचारलं पण त्याने काही दिला नाही. अखेर जॉब सोडून दुसरा शोधायला सुरु केलं.

त्याच दरम्यान मित्रांसोबत एलआयसी ऑफिस मध्ये गेला. तिथं एलआयसीच्या एजन्सी देण्याचं काम चालू होतं. मित्र म्हणाला आपण प्रयत्न करून बघू. ते लायसन्स घ्यायला लागणारी ३५० रुपये फीस देखील त्याच्याकडे नव्हती. पुढे काम चालू झालं. कस्टमर शोधात तो फिरायचा. पुढे मेडिकल क्लेम, कार इन्शुरन्सचं काम सुरु केलं. तो अजूनही साहेब हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत होता. २००७ मध्ये त्याने तो जॉब सोडला.

तो नाविन्यपूर्ण गोष्टी व्यवसायात करून बघायचा. तो नाशिकचा पहिला एलआयसी एजन्ट असेल जो रस्त्यावर किंवा प्रदर्शनात स्टॉल लावायचा. तेव्हा त्याच्याकडे एलआयसी आणि जनरल इन्शुरन्स होतं. नवीन काही करायचं म्हणून म्युच्युअल फंडकडे सचिन वळला. तेव्हा शेअर बाजार खूप तेजीत होता. पहिल्याच वर्षात प्रचंड बिजनेस झाला. संघर्ष संपला वाटलं तेव्हा पुढच्याच वर्षी शेअर बाजारात प्रचंड मंदी आली. तेव्हा सर्व संपलं असं वाटलं.

२००८ मध्ये त्याने एलआयसीचं ऑफिस पर्सनल लोन काढून टाकलं. पहिल्याच ४ महिन्यात एवढा बिजनेस आला कि लोन फेडता आलं. त्याने मुक्त विद्यापीठातून शिक्षणही सुरु ठेवलं. फायनान्सियल मॅनेजमेंटची डिग्री मिळवली. त्या डिग्रीमुळे लोकांकडून गुतंवणूकीसाठी खूप पैसे यायला लागले. त्याचा बिजनेस त्यानंतर बहरतच गेला. १७०० रुपये महिन्याने वेटरचे काम करणाऱ्या सचिनने मागच्या वर्षी तब्बल ४.५० लाख रुपये फक्त टॅक्स सरकारला भरला.

About Mamun

Check Also

शिवरायांच्या भीतीने पोर्तुगीजांनी लग्नात आंदण दिलेल्या मुंबईकडे ब्रिटिश ६ वर्षे फिरकले नव्हते

छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय आरमार दलाचे जनक मानले जाते. पूर्वीच्या काळी भारतात आरमार असल्याचे उल्लेख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *