Sunday , May 28 2023
Breaking News
Home / जीवनशैली / कमी खर्चात फिरायचं आहे? मग कोकणातील या “दहा” जागांपैकी कुठेही जा…

कमी खर्चात फिरायचं आहे? मग कोकणातील या “दहा” जागांपैकी कुठेही जा…

बऱ्याचदा आपल्याला फिरायला जायची तर खूप इच्छा असते. पण त्यामध्ये अनेक अडथळे येतात. खासकरून सर्वात जास्त येणार अडथळा म्हणजे बजेट. बाहेर राज्यात किंवा देशात फिरायला जाण्या एवढे बजेट आपल्याकडे नसते. त्यामुळे अनेकांचा बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन कॅन्सल होतो. पण हाच प्लॅन आता कॅन्सल न करता तुम्ही आपल्या महाराष्ट्राची शान असलेल्या कोकणात फिरायला जाऊ शकता. तुम्हाला कोकणात फिरायला पैसे देखील जास्त लागणार नाहीत.

चला तर मग जाणून घेऊया कोकणातील १० असे ठिकाणे जिथे तुम्ही फिरायला गेलात तर तुमची सुट्टी सार्थकी लागेल. कोकणात असणारे हे समुद्र किनारे महाराष्ट्राच्या सौंदर्यात भर टाकणारे आहेत.

१. हरिहरेश्‍वर- हरिहरेश्वर येथे असणारा समुद्रकिनारा प्रेक्षकांचे आकर्षण केंद्र आहे. हरिहरेश्वर हे मुंबईपासून २१० किमी आहे तर पुण्यापासून १६२ किमी आहे. या प्रवासाला जवळपास ५ तास वेळ लागतो. जवळच असलेल्या श्रीवर्धन येथील शंकराच्या देवस्थानाला येणारे भाविक या बीचला मोठ्या प्रमाणात येतात.

२. श्रीवर्धन- श्रीवर्धनचा किनारा स्वच्छतेसाठी प्रचलित आहे. येथे असणारे स्वच्छ सार्वजनिक शौचालये भारतात समुद्र किनारी तसे दुर्मिळच आहेत. पण या ठिकाणी घरं मात्र किनाऱ्यापासून खूप दूर आहेत. श्रीवर्धनचे मुंबईपासूनचे अंतर २०० किमी असून पुण्यापासून १५० किमी आहे.

३. काशीद- काशीद बीच हा मुंबईपासून १३० किमी असून पुण्यापासूनचे अंतर हे १६७ किमी आहे. काशीद किनारपट्टीची लोकप्रियता देखील प्रचंड आहे. येथे फॅमिलीसोबत येणाऱ्या पर्यटकांची संख्या जास्त असते. समुद्रकिनार्‍यावर कॅस्युरीना वृक्ष, स्नॅक स्टॉल आणि हॅमक्स अशा वृक्षांच्या रांगा आहेत. तर काशिदपासून जवळच अभयारण्य आणि जंजिरा किल्ला आहे.

४. दिवेआगार- दिवेआगार हा मुंबईपासून जास्त दूर नसलेला समुद्रकिनारा असून हा जास्त प्रसिद्ध नाही. पण आता मात्र पर्यटकांचा कल या बीचकडे वाढला आहे. मुंबईपासून २०० किमी अंतर असून पुण्यापासून १५० किमी आहे. घनदाट जंगलातून गेल्यावर आपलं स्वागत येथील समुद्रकिनारा करतो.

५. मुरुड- आंजर्ले ख़ाडीजवळील डोंगररांगांमधून प्रवास करून आल्यावर खाली मुरुडचा समुद्रकिनारा आपले स्वागत करतो. पांढर्‍याशुभ्र समुद्रिपक्ष्यांच्या सान्निध्यात हरवून गेलेला मुरुडचा किनारा तिथे दिसणार्‍या `डॉल्फिन्स`साठीही प्रसिध्द आहे.येथून जवळच हर्णे बीच, सुवर्णदुर्ग किल्ला आहे. हा बीच मुंबईपासून २४० किमी तर पुण्यापासून १४७ किमी आहे.

६. गणपतीपुळे, मालगुंड- गणपतीपुळे गणपतीच्या जुन्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. येथील समुद्र किनारे देखील आकर्षणाचे केंद्रबिंदू आहेत. गणगुतीपुळे पासून सुमारे 2 कि.मी. मालगुंड हे प्रसिद्ध कवी केशवसुतचे यांचे जन्मस्थान असून गावामध्ये त्यांचे स्मारक आहे. जयगड किल्ला, प्राचिन कोंकण संग्रहालय, आरे वारे समुद्र किनारा हे गणपतीपुळेजवळील इतर आकर्षणे आहेत. गणपतीपुळे हे मुंबईपासून ३४० किमी तर पुण्यापासून ३३२ किमी आहे.

७. तारकर्ली – मालवणपासून अवघ्या ७ कि.मी. अंतरावर अतिशय स्वच्छ व सुंदर असा समुद्रकिनारा आणि खाडी ह्यांच्या अनोख्या संगमातून तयार झालेले अद्भूत सौंदर्य तारकर्ली येथे पाहण्यास मिळते. अतिशय सुंदर असा समुद्रकिनारा, बांबूची, सुपारीची झाडे पाहून मन प्रसन्न होते. तारकर्ली मुंबईपासून ५०० किमी आहे तर पुण्यापासून ३९० किमी आहे.

८. भोगवे- भोगवे गावाला कर्ली नदी व समुद्र यांचा संगम पाहायला मिळतो, हे आगळे वेगळे वैशिष्टय आहे. लांबच्या लांब पसरलेली पांढर्‍या शुभ्र व स्वच्छ वाळूची चौपाटी आणि किनार्‍यावरील माड पोफळीच्या बागा यांमुळे या समुद्रकिनार्‍यावरील निसर्गसौंदर्य अधिक देखणे बनले आहे. यांत्रिकी होड्यांमधून समुद्र सफर करत ‘ डॉल्फिन’ चे नृत्य पाहाता येते. हे डॉल्फिन मोठ्या संख्येने येथे पाण्यावर येतात. भोगवे मुंबईपासून ५५० तर पुण्यापासून ४१५ किमी आहे.

९. वेंगुर्ला- गोव्यापासून अर्ध्या तासावर वेंगुर्ला बीच आहे. वेंगुर्ला समुद्रकिनार्‍याला सभोवताली टेकड्या आहेत. लाइट हाउस, जेटी म्हणजे जिथे मच्छीमार मोठ्या प्रमाणावर होते हा परिसर ‘बर्न आयलँड’ म्हणूनही ओळखला जातो. मुंबईपासून ५२० तर पुण्यापासूनचे अंतर ४०० किमी आहे.

१०- अलिबाग- मुंबई पुण्यातून सर्वात जवळ असणारं हे ठिकाण सर्वात जास्त गर्दी असणारं एक ठिकाण आहे. येथील समुद्रकिनारा एवढा विशेष नसला तरी पर्यटक मात्र येथे मोठ्या प्रमाणात असतात. अलिबाग मुंबईपासून १०० किमी तर पुण्यापासून १३७ किमी अंतरावर आहे.

About Mamun

Check Also

आईच्या मृत्यूमुळे आतून तुटलेली अकाउंटंटची मुलगी दुसऱ्या प्रयत्नात टॉपर येत बनली IAS !

यश श्रीमंत किंवा गरीब किंवा लहान, मोठे पाहत नाही, जो योग्य दिशेने कठोर परिश्रम करतो, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *