अक्षय कुमार यांनी फुल और कांटे या सिनेमा साठी संपूर्ण तयारी केली होती, शुटिंग सुरू होणारच होती की त्यांना अचानक फोन आला की तुम्ही शुटिंग साठी येऊ नये. जाणून घेऊ काय घडलं होतं.
बाॅलीवुड मध्ये खिलाडी़ कुमार या नावाने प्रसिद्ध असलेल्या अक्षर कुमारने इंडस्ट्री मधे तीन दशकं पुर्ण केलेत. अक्षय कुमार यांनी सौगंध सिनेमा बाॅलीवुड मघ्ये डेब्यू केला होता जे २५ जानेवारी १९९१ ला रिलीज झाला होता. अक्षर कुमार यांचा डेब्यू सिनेमा बाॅक्स आॅफिसवर जास्त काही चालू शकला नव्हता आणि तो फ्लाॅप झाला.
परंतु , या सिनेमात अक्षय येण्यामागे देखील एक फिल्मी किस्सा आहे .सौगंध या सिनेमाच्या आधि अक्षर कुमार यांना फुलं और काटे या सिनेमाची आॅफर मिळाली होती. अक्षर कुमार यांनी या सिनेमाची पुर्ण तयारी केली होती, शुटिंग सुरू होणारच होती पण अचानक त्यांना एका दिवशी फोन आला की तुम्ही या शुटिंग साठी येऊ नये.
अजय देवगण आणि अक्षय कुमारने आज अनेक सुपरहिट सिनेमे सोबत दिले आहेत. पण त्यांच्या पहिल्या सिनेमासाठी दोघांमध्ये स्पर्धा झाली होती. अक्षय कुमारला मिळालेल्या पहिल्या सिनेमावर अजय देवगणने कब्जा करत अक्षयला बाहेर काढले होते. आणि अजय देवगनचा पहिला सिनेमा हिट ठरला.
फुल और कांटे या सिनेमा मध्ये अक्षय यांच्या जागी अजय देवगण यांना घेण्यात आले आणि त्याच काळात हा सिनेमा सुपरहिट झाला. पण अजय यांच्या जागी अक्षय यांना फुलं और काटे मिळाला असता तर त्यांचा डेब्यू सिनेमा झाला असता. अशात अक्षय कडून फुल और काटे हातातन गेली होती तेव्हा अक्षय यांना सौगंध सिनेमा मिळाला ज्यात त्यांनी बाॅलीवुड मध्ये डेब्यू केला होता.
जरी ही अक्षर यांची फ्लाॅप सिनेमा पासुन सुरुवात झाली आसेल तरी ही आज ते बाॅलीवुड मधीलसुपरस्टार आहेत आणि तो बॉलिवूडचा महागडा स्टार देखील आज आहे. अक्षय लवकरच आपल्याला सूर्यवंशी, रामसेतु, बेलबॉटम या सिनेमातून भेटायला येणार आहे.