असं म्हणतात की जोड्या ह्या स्वर्गात बनवून येतात. देव प्रत्यकाची जोडी कोणा ना कोणाशी बनवून जमिनीवर पाठवतो. आसच बाॅलीवुड मधील एका प्रसिद्ध गायका सोबत झालं.आम्ही आपल्याला बाॅलीवुड मधील एका अशा गायकांच्या बाबतीत सांगणार आहोत जे वयाच्या १६ व्या वर्षीच आपल्या शेजारनीशी प्रेम करुन बसले आणि काही वर्षांत त्यांनी लग्न केले. आज हेच गायक करोडो रुपयांचा मालक आहेत.
आम्ही ज्या गायक विषय सांगतो ते दुसरे तिसरे कोणी नसून शंकर महादेवन आहेत. शंकर महादेवन यांच्या पत्नी चे नाव संगीता आहे . दोघेही वेगवेगळ्या संस्कुतीचा वारसा जपतात. परंतु त्यांच्या आयुष्यात सोबत राहन असंच लिहिलं होतं.
शंकर महादेवन आणि संगीता यांची प्रेम कहाणी बॅडमिंटन खेळते वेळेस सुरू झाली. शंकर महादेवन आणि संगीता या दोघांना पण बॅडमिंटन खेळण्यांची आवड होती. सायंकाळी दोघेही सोबत बॅडमिंटन खेळायचे आणि त्यातूनच ओळख होऊन चांगले मित्र बनले.
दोघांनी पण आपलं प्रेम सगळ्या पासून लपवून ठेवलं आणि एक-मेकांना डेट करत राहिले. हळूहळू त्यांचे प्रेम संबंध त्यांच्या परिवारा ना समजले. त्यांच्या कुटुंबीयांनी दोघांच्या लग्ना ला मान्यता दिली. १९९२ साली शंकर महादेवन आणि संगीता दोघेही लग्नाच्या बंधनात बा़ंधले गेले. त्यांच वेळेस शंकर महादेवन यांनी नोकरी सोडून गाण्यांच्या दुनियेत आपले नाव कमावण्याचे ठरवले. शंकर महादेवन यांच्या निर्णयाला त्यांच्या पत्नी आणि कुटुंबीयांची सोबत मिळाली.
लग्ना नंतर शंकर महादेवन आणि संगीता दोन मुलांचे आई-वडील बनलेत. शंकर महादेवन यांना संगीत क्षेत्रात आपली ओळख बनवण्यास खुप समस्यांचा सामना करावा लागला.परंतु आज शंकर महादेवन यांचे खुप मोठे नाव आहे.
तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल कि ते १६ व्या वर्षीच प्रेमात पडले होते. त्या दरम्यान संगीता फक्त १४ वर्षाच्या होत्या. संगीता यांचा महाराष्ट्राशी संबंध होता आणि त्यांच्या शेजारी राहत होत्या. शंकर महादेवन आणि संगीता यांची भेट एका मित्रामुळे झाली होती. शंकर महादेवन यांचे गाणे लोकांना खुप आवडतात. शंकर महादेवन आज करोडो रुपयांच्या संपत्तीचे मालक आहेत आणि पत्नि संगीता सोबत खुप आनंदी जीवन जगत आहेत.