Monday , June 5 2023
Breaking News
Home / राजकारण

राजकारण

…जेव्हा नितीन गडकरींनी दिल्लीत भारत सरकारचा बोर्ड उखडून लावला होता महाराष्ट्राचा बोर्ड!

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. त्यांचे असंख्य किस्से गाजलेले आहेत. ते अनेकदा आपल्या भाषणातून विविध गोष्टींचा उलगडा करत असतात. काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. यात महाराष्ट्रातील चार जणांचा मंत्रिमंडळात समावेश झाला. या नवोदित मंत्र्यांचा सत्कार समारंभ दिल्लीतील महाराष्ट्र सदनात आयोजित करण्यात आला …

Read More »

ज्या महानगरपालिकेसमोर भीक मागून खाल्लं तिथंच बनली पारधी समाजाची पहिली नगरसेविका!

पारधी समाज हा आपल्याकडे एक गु न्हेगारी पार्श्वभूमी असलेला समाज म्हणून ओळखला जातो. या समाजात स्त्रियांना शिक्षणापासून दूर ठेवलं जातं. पण या समाजातून आलेली एक महिला मोठा संघर्ष करून आज पुणे महानगरपालिकेत नगरसेविका म्हणून कार्यरत आहे. या महिलेने एकेकाळी पुणे महानगरपालिकेसमोर भीक मागून खाल्लं. तिथंच ती आज मानाने नगरसेविका म्हणून …

Read More »

शेतकऱ्यांनी गहाण ठेवलेल्या वस्तू सोडवण्यासाठी शंकरराव चव्हाणांनी ५० कोटींचा निधी दिला होता!

महाराष्ट्राला आतापर्यंत चव्हाण आडनावाचे चार मुख्यमंत्री मिळाले. यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण ! यापैकी शंकरराव चव्हाण आणि अशोक चव्हाण हे पितापुत्र होत. शंकरराव चव्हाण यांच्याबद्दल सांगायचे झाले तर महाराष्ट्राची विधानसभा आणि विधानपरिषद तसेच देशाची लोकसभा आणि राज्यसभा या चारही सभागृहात त्यांना काम करण्याची संधी मिळाली. महाराष्ट्राच्या …

Read More »

नसबंदीच्या बाबतीत हिटलरसुद्धा संजय गांधींचे पाय धुवून पाणी पिला असता

जर्मनीचा हुकूमशहा आणि नाझी पक्षाचा नेता असणाऱ्या एडॉल्फ हिटलरचे नाव जागतिक इतिहासातील क्रूरकर्मा म्हणून घेतले जाते. पहिल्या महायुद्धात सैनिक म्हणून काम करणारा हिटलर आपल्या बुद्धिचातुर्याच्या व प्रभावशाली वक्तृत्वाच्या जोरावर जर्मनीचा हुकूमशहा बनला आणि दुसऱ्या जागतिक महायुद्धाला कारणीभूत असणारी व्यक्ती बनला. हिटलरच्या काळात जर्मनीत एक असा कायदा केला होता, ज्यामध्ये जन्मजात …

Read More »

..तर संजय गांधींसोबत विमान अपघातात माधवराव सिंधिया देखील मेले असते

संजय गांधी हे भारतीय राजकारणाच्या इतिहासातील असे नाव आहे, जे आपल्या बेदरकार व्यक्तिमत्वासाठी प्रसिद्ध आहे. असं सांगितलं जातं की संजय गांधींचा गतिमानतेवर फार विश्वास होता. ज्या गतीने ते राजकारणात आले, ज्या गतीने त्यांनी राजकारणाची सर्व सूत्रे आपल्या ताब्यात घेतली आणि ज्या गतीने त्यांनी आपले राजकीय निर्णय प्रत्यक्षात उतरवले; तीच गती …

Read More »

एकदा थेट अजित पवारांचाच फोन हॅक करुन त्यावरुन लोकांना पैशांची मागणी करण्यात आली होती

गेले दोन तीन दिवस झाले पेगाससची सगळ्याच माध्यमांवर चर्चा आहे. इस्राईलच्या NSO ग्रुपने तयार केलेल्या या स्पायवेअरद्वारे भारतातील ३०० हून अधिक लोकांचे फोन टॅप करण्यात आल्याचे आरोप मोदी सरकारवर करण्यात आले आहेत. ज्यांचे फोन टॅप केले गेले, त्या लोकांमध्ये राहुल गांधी, केंद्रातील दोन मंत्री, निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर, माजी निवडणूक …

Read More »

बाळासाहेब ठाकरेंनी धनराज पिल्लेला दिलेला शब्द २४ तासांच्या आत खरा करुन दाखवला होता

मंडळी भारताचा राष्ट्रीय खेळ असणाऱ्या हॉकीचे जादूगार म्हणून ध्यानचंद यांना ओळखले जाते. ध्यानचंद यांचा करिश्मा इतका जबरदस्त होता की १९३६ सालच्या ऑलंपिक स्पर्धेमध्ये जर्मनीच्या संघाला ८-१ ने धूळ चारल्यानंतर दस्तुरखुद्द जर्मनीचा हुकूमशहा हिटलरने ध्यानचंदांना त्यांच्या सैन्यात वरिष्ठ पदाची ऑफर दिली होती, जी त्यांनी नाकारली. मेजर ध्यानचंदांनंतर मात्र भारतीय हॉकीची दुर्दशा …

Read More »

…तर बाळासाहेब नाही तर आचार्य अत्रे बनले असते पहिले शिवसेनाप्रमुख !

आचार्य अत्रे आणि प्रबोधनकार ठाकरे या जोडगोळीने संयुक्त महाराष्ट्र चळवळीसाठी खूप कष्ट घेतले. हे दोन शिलेदार नसते तर संयुक्त महाराष्ट्राची लढाई जिंकणे दुरापास्त होते. त्या दोघांमध्ये घनिष्ट अशी मैत्र होती. ज्यावेळी लोकवर्गणीतून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसाठी तोफा डागणारे अत्र्यांचे “मराठा” दैनिक सुरु झाले, त्यावेळी प्रबोधनकार ठाकरे ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिले. …

Read More »

बाळासाहेब ठाकरेंची सावली बनून सेवा करणारे “चंपा” खरंच ग्रेट आहेत

चंपा हे नाव सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणात गंमतीदार पद्धतीने वापरले जाते. राजकारणात टीका करताना कुणी कुणाबद्दल कशा पद्धतीने बोलावं हा ज्याचा त्याचा निर्णय आहे. आज आम्ही तुम्हाला ज्या चंपाबद्दल सांगणार आहोत तो राजकीय क्षेत्रातच आहे, पण त्या नावाला शिवसेनेच्या गोटात फार आदर आहे. ते नाव म्हणजे चंपासिंग थापा. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची …

Read More »

…त्या एका भांडणामुळे योगी आदित्यनाथ यांची राजकारणात एंट्री झाली!

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा आज ५० वा वाढदिवस आहे. त्यांना कुठल्या वेगळ्या अशा परिचयाची गरज नाही, कारण अत्यंत कमी वयातच त्यांनी जे यश प्राप्त केले आहे ते अतुलनीय आहे. ५ जून १९७२ रोजी उत्तराखंड (तेव्हाचे उत्तरप्रदेश) मधील पौडी जिल्ह्यात असणाऱ्या यमकेश्वर तालुक्यातील पंचुर या छोट्याशा गावात त्यांचा जन्म झाला. …

Read More »