बाॅलीवुड मधील कलाकारांची मैञी जग जाहिर असते. एकत्र काम केल्याने ती मैञी खूप छान होते, परंतु असं नेहमी नाही होत. काही वेळा असंही होतं की कलाकार एकमेकांचे शत्रू बनतात. बॉलिवूडमध्ये अशा खुप गोष्टी ऐकायला येतात. तुम्ही असं अनेकदा ऐकलं असेल, दोन अभिनेते आप आपसात भांडले.
पण असं खुप कमी ऐकायला येत की, दोन अभिनेत्रींचे भांडण झाले. त्यातच दोन अभिनेत्रींनमध्ये हाणामारी झाल्याचं तर क्वचितच ऐकलं असेल. पण आज आम्ही तुम्हाला दोन अभिनेत्रींच्या शत्रुत्वा विषयी सांगणार आहोत. अभिनेत्री करीना कपूरने बिपाशा बासूच्या थेट थोबा डीत मारली होती.
बिपाशा आणि करीना यांचे भांडण अजनबी या सिनेमा पासुन आहे. हा सिनेमा २००१ मध्ये रिलीज झाला आहे. या सिनेमा मध्ये बिपाशा आणि करीना यांच्याशिवाय अक्षय कुमारची देखील मुख्य भूमिका होती. अजनबी मध्ये बाॅबी देओलची भूमिका पण मुख्य होती.
अजनबी सिनेमाच्या वेळेस करीना आणि बिपाशा या दोघी पण एंड्स्टी मध्ये नविन होत्या, आणि करियरच्या सुरुवातीलाच दोघींनी सोबत काम केलं होतं. परंतु त्या काळात काही असं पण झालं की त्यां नंतर त्यां दोघींनी सोबत काम नाही केलं.या गोष्टी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.
करिनाने २००० मध्ये आलेल्या रीफुजी मधून बॉलिवूडमध्ये एंट्री केली. हा सिनेमा जास्त काही चालला नव्हता. पण त्याच्या नंतरच्या वर्षी अजनबी सिनेमात ती दिसली. हा सिनेमा चांगला चालला. सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. बोलले जाते कि एका ड्रेसवरून दोघींमध्ये वाद झाला होता. हा वाद एवढा वाढला कि रागाच्या भरात करिनाने बिपाशाच्या कानशिलात लगावली.
या दोघींचा हा वाद मीडियात खूप चर्चेत राहिला पण दोघीनी कुठेही याविषयी एक शब्द नाही काढला. या सिनांतील त्यांचा हा वाद एवढा ताणला गेला कि त्या दोघीनी नंतर कधीच सोबत काम नाही केलं. करिनाने एकदा बिपाशाच्या अभिनयाची कॉफी विथ करण मध्ये खिल्ली उडवली होती.
पुढे या दोघींचं नातं २०१२ मध्ये थोडं सुधारलं. करिनाने सैफ सोबत लग्न केल्यानंतर बिपाशाला पती सैफच्या जन्मदिवसाला आमंत्रित केलं होतं. दीपाशा देखील पार्टीला हजर राहिली होती.