KBC हा शो जेव्हापासून सुरु झाला तेव्हापासून तो एक सुप्रसिद्ध शो राहिला आहे. या शो च्या प्रसिद्धीमध्ये प्रत्येक शो नंतर वाढच होत गेली आहे. लोक KBC फक्त बघतच नाहीत तर त्यांना या शो मध्ये भाग घेण्यास देखील खूप आवडते. टीव्हीवर आजपर्यंत अनेक शो आले आणि गेले पण कोणताच शो या शो ची बरोबरी करू शकला नाही.
KBC ने प्रत्येक वर्गातील लोकांमध्ये एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. KBC चा नुकताच १२ वा सीजन २०२० मध्ये पार पडला. कोरोनाच्या काळात देखील अमिताभ बच्चन यांनी हा शो होस्ट केला. या शो चे सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे या शो ने गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबाना आपले स्वप्न पूर्ण करण्याचा प्लॅटफॉर्म दिला आहे. असे अनेक कारण आहेत ज्यामुळे हा शो एवढा प्रसिद्ध आहे.
विजेत्यांना दिले जाणारे करोडो रुपये कुठून येतात?
कौन बनेगा करोडपती या शोमध्ये सहभागी होऊन विविध भागातील लोक आपल्या प्रतिभेचा वापर करून लाखो करोडो रुपये एका दिवसात कमवून जातात. आज पर्यंत अनेकांनी करोडो रुपयांची बक्षीस जिंकली आहेत. हा शो बघताना कधी ना कधी तुमच्या मनात हा विचार नक्की आला असेल कि या शो ला एवढे पैसे मिळतात कुठून? शो मध्ये भाग घेणार्यांना दिले जाणारे करोडो रुपये येतात कुठून?
विजेत्यांना येथून दिले जातात करोडो रुपये-
आम्ही तुमच्या या प्रश्नांचं उत्तर घेऊन आलो आहोत. जर तुमच्याही मनात हे प्रश्न आले असतील तर त्याचे उत्तर हि जाणून घ्या. या शो मध्ये दिले जाणारे पैसे हे शो च्या दरम्यान दाखवल्या जाणाऱ्या जाहिरातीमधून मिळणाऱ्या पैशातून दिले जातात. शो मधील विजेत्यांना दिले जाणारे पैसे हे सोनी टीव्हीवर दाखवण्यात येणाऱ्या जाहिरातीच्या पैशातून दिले जातात.
KBC शो मुळे सोनी टीव्हीच्या टीआरपी मध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. जेव्हा हा शो चालू असतो तेव्हा तर टीआरपी प्रचंड वाढतो. त्यामुळे या शोमध्ये दाखवण्यात येणाऱ्या जाहिरातीतूनही प्रचंड कमाई होते.
जाहिरातीतून कसे मिळतात पैसे?
सोनी टीव्ही किंवा इतर चॅनेलवर जाहिरातीतून येणारा पैसे हे विजेत्यांसाठी किंवा शो होस्ट करणाऱ्या जज साठी वापरला जातो. चॅनेल वर जाहिरातीचे प्रति सेकंद २००० ते ५००० रुपये घेतले जातात. तर सोनी टीव्हीवर जाहिराती देखील मोठ्या प्रमाणात येतात आणि त्यातून होणारी कमाई देखील प्रचंड असते.