सचिन वाझे याने जी गाडी अंबानींच्या घरासमोर ठेवली होती त्या गाडीबद्दल अनेक नवनवीन खुलासे आजपर्यंत झाले आहेत. सचिन वाझे यानेच हि गाडी अँटिलीया समोर ठेवल्याचे उघड झाले होते. जेव्हा हि गाडी अंबानींच्या घरासमोर सापडली होती तेव्हा याचा तपास सचिन वाझे याच्याकडेच आला होता. त्या तपासाच्या दरम्यान त्याने अनेक पुरावे नष्ट करण्याचं काम केलं होतं.
या प्रकरणाचा तपास NIA कडे गेल्यानंतर यामध्ये अनेक मोठे खुलासे झाले. स्कॉर्पिओ गाडीमालक मनसुख हिरेन यांच्या ह त्येचा तपास देखील आता NIA कडे आहे. दरम्यान एनआयएला तपासामध्ये मिठी नदीमध्ये काही इलेक्ट्रॉनिक वस्तू देखील सापडल्या आहेत. या पुराव्यांमधून सचिन वाझेंचा या प्रकरणाशी संबंध असल्याचं स्पष्ट होत असल्याचं एनआयएचं म्हणणं आहे. त्याचवेळी औरंगाबादमधील एका चोरीला गेलेल्या इको गाडीच्या नंबर प्लेटही सापडल्या होत्या.
सचिन वाझे यांच्याशी संबंधित या प्रकरणातील अनेक गाड्या एनआयएनं ताब्यात घेतल्या आहेत. आजच वाझेची एक स्पोर्ट्स बाईक देखील NIA ने ताब्यात घेतली आहे. सचिन वाझे सध्या पोलीस कोठडीत असून त्याच्या कोठडीमध्ये ७ एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. मिठी नदीतून मिळालेला सीसीटीव्ही डेटा आणि वाझेंच्या पासपोर्टची चौकशी आता NIA करणार आहे.
दरम्यान आता या प्रकरणात एक महत्वाचा खुलासा झाला असून NIA च्या हाती महत्वाची माहिती लागली आहे. या माहितीमुळे सचिन वाझेचा खरा प्लॅन समोर आला आहे. गाडी प्रकरण दाबण्यासाठी सचिन वाझे २ फेक एन काऊंटर करणार होता. यासाठी सर्व तयारी देखील झाली होती. दोघांचा ए न्काउंटर करून त्या स्कॉर्पिओ गाडीची केस त्या दोघांवर टाकून हे प्रकरण वाझे दाबणार होता. ते दोघे कोण होते हे देखील NIA ला शोधावे लागणार आहे.
यासाठी वाझे आणि त्याच्या साथीदारांनी औरंगाबाद मधून एक इको गाडी चोरली होती. त्याच इकोमधून सचिन वाझे ४ मार्चला ७ च्या सुमारास भायखळा येथे गेला होता. सचिन वाझे यांनी मनसुख हिरेन यांना फोन करुन घोडबंदर रोडवर बोलावले होते तिथून त्याने एकूण ८ जणांना मनसुख यांचा ताबा ठाण्यातील माजीवडा सर्कल येथे दिला.
यानंतर सचिन वाझे मनसुख हिरेन च्या ह त्येच्या वेळी मुंबईत होता हे दाखवण्यासाठी त्याने जिप्सीबार वर धाड टाकली. या रेडमध्ये काहीच सापडलं नाही असा पंचनामा केला. मिठी नदीत सापडलेल्या त्या नंबर प्लेट त्या इको गाडीच्या होत्या. दरम्यान मुकेश अंबानी आणि कुटुंबियांना लिहिलेली धम किची चिट्ठी मात्र तो स्कॉर्पिओ मध्ये ठेवायचं विसरला होता. त्यानंतर २५ फेब्रुवारीला पुन्हा वाझे घटनास्थानी गेला होता. मिठी नदीत सापडलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मधून काय माहिती बाहेर येते हे आता बघावं लागणार आहे.