एक काळ असा होता जेव्हा सुनील शेट्टी हा एक सुपरस्टार म्हणून सर्वश्रुत होता. लोकांना सुनील शेट्टीचे ऍ क्शन हिरो म्हणून केलेले काम खूप आवडायचे. सुनील शेट्टी हा दिसायला एवढा भारी नसला तरी त्याने आपल्या अभिनयाच्या ताकदीवर मोठं नाव फिल्म इंडस्ट्रीमध्ये कमावलं आहे.
सुनील शेट्टी हा न कारात्मक भूमिकेत असो किंवा मग सकारात्मक भूमिकेत त्याने आपल्या भूमिका चांगल्याच गाजवल्या आहेत. २००१ मध्ये आलेल्या धडकन सिनेमातील अभियानासाठी सुनील शेट्टीला फिल्मफेअर अवॉर्ड देखील मिळाला आहे. सुनील शेट्टीने आपल्या करिअरमध्ये आतापर्यंत १०० हुन अधिक सिनेमात काम केले आहे.
सुनील शेट्टी आज एक यशस्वी अभिनेताच नाही तर एक यशस्वी उद्योगपती देखील आहे. त्याने उभारलेल्या हॉटेल व्यवसायातून तो आज करोडोंचा मालक बनला आहे. सुनील शेट्टीकडे एव्हडी प्रॉपर्टी आज आहे कि तुम्ही अंदाज देखील लावू शकत नाही.
सुनील शेट्टीच्या हॉटेलचं जाळं पूर्ण देशभरात पसरलेलं आहे. सुनील शेट्टीची मुंबईच्या सर्वात पॉश एरियात ‘एच 20’ नावाची हॉटेल आहे. हे एक बार आणि रेस्टोरंट आहे. त्यांच्या या हॉटेलच्या शाखा दक्षिण भारतात देखील आहेत.
सुनील शेतीकडे एक फिल्म प्रोडक्शन कंपनी देखील आहे जिचे नाव आहे ‘पॉपकॉर्न एंटरटेनमेंट’. एवढेच नाही तर सुनीलच्या फॅमिलीचा एक बुटीक बिजनेस देखील आहे. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल पण सुनील शेट्टीची वार्षिक कमाई हि १०० कोटींपेक्षा अधिक आहे. पण तुम्हाला याहून जास्त आश्चर्य तेव्हा वाटेल जेव्हा सुनीलच्या पत्नीची कमाई तुम्हाला समजेल.
माना शेट्टी सुनील शेट्टीपेक्षा अधिक पटीने कमाई करते. खरंतर माना शेट्टीचं नाव भारतातल्या पॉवरफुल बिजनेस महिलांमध्ये येते. ती सोबतच अनेक बिजनेस यशस्वीपणे सांभाळत आहे. तिच्या बिजनेस सांभाळण्याच्या कौशल्याचे अनेक जण दिवाने आहेत. माना एक फक्त बिजनेस वूमेनच नाही तर ती सामाजिक कार्य देखील मोठ्या प्रमाणात करते.
रिअल इस्टेटचा बिजनेस देखील माना शेट्टीच सांभाळते. S2 नावाच्या प्रोजेक्ट अंतर्गत त्यांनी २१ पेक्षा अधिक लक्जरी व्हिला बनवले आहेत.