Sunday , May 28 2023
Breaking News
Home / जीवनशैली / VIP सुविधा न वापरणारा, रस्त्यावर साध्या हॉटेलमध्ये जेवणारा, स्कुटरवर मंत्रालयात जाणारा मुख्यमंत्री

VIP सुविधा न वापरणारा, रस्त्यावर साध्या हॉटेलमध्ये जेवणारा, स्कुटरवर मंत्रालयात जाणारा मुख्यमंत्री

देशात असे खूप कमी नेते आपल्याला बघायला मिळतील जे आपल्या साधारण राहणी साठी प्रसिद्ध आहेत. असेच एक नेते देशात होऊन गेले जे आपल्या साधारण राहणी साठी सर्वश्रुत होते. या साधारण राहणाऱ्या नेत्याचं शिक्षण मात्र आयआयटीमधून झालेलं होतं. हे नेते होते दिवंगत मनोहर पर्रीकर.

ते चार वेळा गोव्याचे मुख्यमंत्री होते. मात्र, चारवेळा मुख्यमंत्री पद भूषवूनही त्यांनी कुठल्याही व्हीआयपी सुविधांचा कधीही उपभोग घेतला नाही. ते भारताचे पहिले असे मुख्यमंत्री होते ज्यांनी आयआयटीचं शिक्षण घेतलं होतं. मुख्यमंत्री असूनही ते शासकीय निवासात राहिले नाही. सरकारी गाड्या देखील ते टाळायचे. कुठेही येण्या-जाण्यासाठी ते रिक्षा किंवा इतर सार्वजनिक वाहतुकीचा वापर करायचे. विमानातून प्रवास करतानाही ते नेहमी इकॉनॉमी क्लासमधूनच प्रवास करायचे.

मनोहर पर्रीकर यांचं संपूर्ण आयुष्य हे इतरांसाठी प्रेरणा देणारे आहे. मनोहर गोपालकृष्‍ण प्रभु पर्रीकर यांचा जन्म १३ डिसेंबर १९५५ रोजी गोव्यातील मापुसा मध्ये झाला. त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण मारगाव मध्ये घेतले. १९७८ मध्ये मनोहर पर्रीकर यांनी आयआयटी मुंबईमधून इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं आहे. मनोहर पर्रीकरांच्या पत्नी मेधा यांनी २००१ मध्ये कॅन्सरमुळे जगाचा निरोप घेतला.

आयआयटीमधून शिक्षण झालेल्या पर्रीकरांचा राजकीय प्रवास चढ उताराने भरलेला होता. त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात १९९४ मध्ये झाली. त्यावेळी ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. पुढे ते १९९९,२००२,२००७ आणि २०१२ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये पणजी विधानसभा मतदारसंघातून गोवा विधानसभेवर निवडून गेले.

मनोहर पर्रीकर हे २००० मध्ये पहिल्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री बनले. २००२ पर्यंत कारभार चालवल्यानंतर पुन्हा त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपद आलं. २००५ मध्ये सरकार अल्पमतात आल्याने सरकार कोसळलं. २०१२ मध्ये ते पुन्हा मुख्यमंत्री बनले. २०१४ मध्ये देशात भाजपची सत्ता आल्यानंतर पर्रीकरांना दिल्लीत बोलवण्यात आलं.

पर्रीकर गोव्याच्या मुख्यमंत्रिपदावर असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी पर्रीकरांना केंद्रीय मंत्रीमंडळामध्ये सामील होण्याचे आमंत्रण दिले. त्यानुसार पर्रीकरांनी गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला व ९ नोव्हेंबर २०१४ रोजी केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली होती. पर्रीकरांनी देशाचे संरक्षण मंत्री म्हणून आपला कार्यकाळ देखील गाजवला. ते संरक्षण मंत्री असतानाच सर्जिकल स्ट्रा ईकचा मोठा निर्णय झाला होता.

पर्रीकर हे आपल्या साधेपणासाठी प्रसिद्ध होते. गोव्याचे मुख्यमंत्री असताना पर्रीकर हे अनेकदा स्कुटरवर मंत्रालयात जायचे. एवढेच नाही तर ते अनेकदा मतदारसंघाचा दौरा देखील स्कुटरवर करायचे.

स्कुटरवर जाताना रस्त्यात कुठेही थांबून ते एखाद्या साध्या हॉटेलमध्ये जेवायचे. त्यांना अनेकदा रस्त्यावर चहा पिताना देखील बघितलं आहे. त्यांना लोकं स्कुटरवाला मुख्यमंत्री म्हणून देखील ओळखायचे. पर्रीकर हे जेव्हा एखाद्या कार्यक्रमाला जायचे तेव्हा ते खूप सध्या कपड्यांमध्ये राहायचे. त्यांचा एक किस्सा खूप प्रसिद्ध आहे.

पर्रीकर हे एकदा एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी निघाले होते. यासाठी एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये त्यांना जायचं होतं. पण त्यांची गाडी त्यावेळी खराब झाली. त्यावेळी त्यांनी तात्काळ टॅक्सी बोलावली आणि साधारण कपडे आणि चप्पल घालून हॉटेलला पोहचले. टॅक्सी हॉटेलला पोहचल्यावर त्यांना फाईव्ह स्टार हॉटेलच्या घेतलाच चौकीदारानी रो खले. ते म्हणाले तुम्हाला प्रवेश नाही मिळणार.

पर्रीकरांनी त्या चौकीदाराला ते गोव्याचे मुख्यमंत्री असल्याचे सांगितले. त्यावेळी तो चौकीदार मोठ्यामोठ्याने हसायला लागला आणि म्हणाला तुम्ही गोव्याचे मुख्यमंत्री असाल तर मी गोव्याचा राष्ट्रपती आहे. त्यावेळी आयोजक तिथे पोहचले आणि पर्रीकर कार्यक्रमात पोहचले. १७ मार्च २०१९ रोजी मनोहर पर्रीकर यांनी जगाचा निरोप घेतला. वयाच्या ६३ व्या वर्षी स्वादुपिंडाच्या कर्करोगाने त्यांचं निधन झालं.

About Mamun

Check Also

आईच्या मृत्यूमुळे आतून तुटलेली अकाउंटंटची मुलगी दुसऱ्या प्रयत्नात टॉपर येत बनली IAS !

यश श्रीमंत किंवा गरीब किंवा लहान, मोठे पाहत नाही, जो योग्य दिशेने कठोर परिश्रम करतो, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *